Breaking News

खोपोलीत घनकचरा व्यवस्थापनाचे तीन तेरा

खोपोली : प्रतिनिधी

शहरातील नाले व गटारे सफाईचा गाळ व कचरा पंधरा दिवस उलटले तरी तसाच पडून आहे. भाजी मंडई, मासळी मार्केट, विविध रहिवासी भाग, रस्ते व मोकळ्या जागेत जमा होत असलेला कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने, खोपोलीत घनकचरा व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजले आहेत. ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग निर्माण झाल्याने स्वच्छ खोपोली सुंदर खोपोलीचा नारा कागदावर असल्याचे स्पष्ट होत आहे.

खोपोलीतील घनकचरा व्यवस्थापनासाठी विशेष टीम आहे. शहरातील कचरा गोळा करण्यासाठी आधुनिक गाड्या आहेत. सोबत ठेकेदारांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. याकरिता नगरपालिकेचे वार्षिक बजेट 12 कोटींपेक्षा अधिक आहे. मोठ्या फौजफाट्यासह आवश्यक मनुष्यबळही नगरपालिकेजवळ आहे. तरीही खोपोली शहरात ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग पडून राहत असल्याने नगरपालिकेच्या सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य खात्याच्या कारभारावर चौफेर टीका होत आहे. तरीही या विभागातील अधिकारी मात्र निष्क्रियपणाने आम्हाला काय त्याचे, या भूमिकेतून कामकाज करताना दिसत आहे. सार्वजनिक स्वच्छतेबाबत बिघडत असलेल्या स्थितीची सभापती प्रमिला सुर्वे, नगराध्यक्ष सुमन औसरमल यांनी दखल घेतली असून, दैनंदिन कामाचा आढावा घेण्यासाठी विशेष उपाययोजना त्यांनी केल्या आहेत. तसेच या विभागातील अधिकारी, ठेकेदार व कर्मचार्‍यांना दैनंदिन कामे वेळेवर करा नाहीतर कार्यवाहीला सामोरे जा, असा इशारा दिला आहे.

घनकचरा व्यवस्थापन व दैनंदिन साफसफाईच्या कामाचा दररोज आढावा घेतला जात आहे. कामचुकार ठेकेदार व नगरपालिका अधिकारी व कर्मचार्‍यांना कडक ताकीद देण्यात आली आहे. लवकरच स्थिती सामान्य होईल.

-गणेश शेटे, मुख्याधिकारी, खोपोली

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply