Breaking News

ही कामगिरी आमच्यासाठी लाजिरवाणी -डुप्लेसिस

लंडनः वृत्तसंस्था

दक्षिण आफ्रिकेचे यंदाच्या वर्ल्ड कपमधून असे साखळीत गारद होणे लाजिरवाणे असून, संपूर्ण संघाची कामगिरी ही अतिसामान्य होती, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती दक्षिण आफ्रिकेचा नाराज, निराश कर्णधार फाफ डुप्लेसिसने. हा संघ अक्षरशः क्षीण वाटला, तेव्हा या अपयशाची जबाबदारी प्रत्येकाची आहे अन् त्याने ती स्वीकारावी, असे खडे बोलही या कर्णधाराने आपल्या संघाला सुनावले आहेत. रविवारी पाकिस्तानकडून 49 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या उरल्यासुरल्या बाद फेरीच्या अपेक्षाही धुळीस मिळाल्या आहेत. पाकिस्तानविरुद्ध आम्ही ज्याप्रकारे खेळलो त्याने आम्हाला जवळपास लाजच आणली आहे. हे पराभव खूपच जिव्हारी लागणारे आहेत. सुरुवात गोलंदाजांनी केली. फक्त अचूक टप्पा राखला असता तरी पाकिस्तानला त्रिशतकी आव्हान उभारता आले नसते. गुण द्यायचे झाले तर गोलंदाजांना मी दहापैकी पाचच गुण देईन. तोच कित्ता फलंदाजांनीही गिरवला. भागीदारी होत होती; पण नंतर विकेटचा सिलसिला सुरू झाला, असे डुप्लेसिसने सांगितले.

Check Also

कबड्डी महाराष्ट्राचा श्वास, तर रायगड जिल्हा कबड्डीपटूंची खाण -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राच्या मातीत रूजलेली कबड्डी राज्याचा श्वास असून रायगड जिल्हा कबड्डीपटूंची खाण आहे, …

Leave a Reply