Breaking News

टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषची कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन अन्‌‍ शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि जागतिक ख्यातीची आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका संदीप घोष हिची आगामी कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या मानाच्या स्पर्धेत ती आता भारताचे प्रतिनिधित्व करणार असून याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिकाचे अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
स्वस्तिका घोष ही सध्या सीकेटी महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. उच्च शिक्षणासोबतच तिने खेळातील सातत्य आणि आपला जागतिक दर्जाचा फॉर्म कायम राखला आहे. टेबल टेनिसच्या पटलावर आपल्या वेगवान आणि आक्रमक खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या स्वस्तिकाने यापूर्वीही अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करून पनवेलसह महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उंचावले आहे. आता कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाकडून खेळताना सुवर्णपदक जिंकण्याचे तिचे लक्ष्य असणार आहे.
स्वस्तिकाच्या या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, नगरसेवक परेश ठाकूर, सचिव डॉ. एस.टी. गडदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के.पाटील, क्रीडा संचालक डॉ. विनोद नाईक, इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. आर.व्ही. येवले यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी तिचे भरभरून कौतुक केले आहे.

Check Also

अलबेला @ ७५ वर्षे भोली सुरत दिल के खोटे….

काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन …

Leave a Reply