उरण ः वार्ताहर21 जून हा दिवस संपूर्ण देशात व जगभरात ’जागतिक योग दिवस ’ म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही सिटीझन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ’जागतिक योग दिवस’ मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला कॉलेजचे प्राचार्य आरिफ बक्षी यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. सुमारे दोनशे विध्यर्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रमोद पाटील यांनी योगचबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक ,कर्मचारी उपस्थित होते.
Check Also
भारत टॅक्सी सेवा प्रवासी आणि चालकांसाठी नवा अध्याय -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पनवेल ः रामप्रहर वृत्तसहकारी तत्त्वावरील भारत टॅक्सी सेवा प्रवासी आणि चालकांसाठी एक नवा अध्याय असून …
RamPrahar – The Panvel Daily Paper