Breaking News

पनवेल मनपाला लवकरच मिळणार जीएसटी अनुदान

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेचे वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) शासनाकडे थकलेले अनुदान त्वरित मिळावे यासाठी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर व नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची 25 जून रोजी भेट घेतली. ना. मुनगंटीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासित केले. त्यामुळे पनवेल महापालिकेला लवकरच जीएसटीचे अनुदान मिळणार आहे.

या शिष्टमंडळात स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती अध्यक्ष संजय भोपी, तेजस कांडपिळे, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, संतोष शेट्टी यांचा समावेश होता.

पनवेल महानगरपालिका 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापन झाली, तर 1 जुलै 2017पासून राज्यात एलबीटी बंद करण्यात येऊन नवीन जीएसटी प्रणाली सुरू करण्यात आली. महापालिकांचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांना राज्य शासनाने जीएसटीचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु पनवेल महापालिकेला आजपर्यंत जीएसटीचे अनुदान मिळालेले नाही. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर व महापालिकेने यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.

स्थानिक निधी लेखा शाखेने प्रमाणित केल्यानुसार व महापालिका प्रशासनाने 9 मे 2019 रोजी मागणी केल्याप्रमाणे प्रलंबित 466.40 कोटी आणि चालू वर्षातील दरमहा 24.77 कोटी जीएसटीचे अनुदान महापालिकेला लवकरात लवकर मिळावे, अशी पुनर्मागणी या वेळी शिष्टमंडळाने केली. यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन संबंधित अधिकार्‍यांसोबत याविषयी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

Check Also

कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक

कठोर उपाययोजना करणार -वनमंत्री गणेश नाईक पनवेल : रामप्रहर वृत्तकोकणातील आंबा व काजू बागांचे वणव्यांमुळे …

Leave a Reply