Breaking News

बावनबंगला येथे घरफोडी

पनवेल ः पनवेल शहरातील बावनबंगला येथील पाटकरवाडामधील एका घरात येथील सुरक्षा रक्षकानेच घरफोडी केल्याने जवळपास दोन लाख रुपये चोरुन नेल्याची घटना घडली आहे. बावनबंगला येथील पाटकरवाडा येथे पहिल्या मजल्यावर असलेल्या आदिनाथ पाटकर यांचे घर बंद असल्याचे पाहून त्यांच्याकडे असलेल्या सुरक्षा रक्षकानेच घरात प्रवेश करून घरातील कपाटात असलेले जवळपास दोन लाख रुपये काढून घेऊन तो आपल्या कुटुंबियासह पसार झाला आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

व्यावसायिक कोर्सेससाठी प्रवेश सुरु

उरण ः प्रधानमंत्री कौशल्य केंद्र उपक्रमांतर्गत सर्वांसाठी लॉजिस्टीक क्षेत्रातील शासनमान्य व्यावसायिक प्रशिक्षण कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. या प्रशिक्षणात व्यावसायिक जडवाहन चालक, वेअरहाउस पिकर, कान्सेईमेंट टॅकिंग एक्सेव्युटीव्ह, कान्सेईमेंट बुकिंग असिस्टंट, डोक्युमेटेशन असिस्टंट, इन्व्हेटरी  क्लर्क आदी कोर्सेस आहेत. तसेच इंग्लिश स्पिकिंग कोर्स, टॅली व कॉम्पुटर प्रशिक्षण आदी कोर्सेस आहेत. त्याचप्रमाणे मुलींना विद्यावेतन देण्यात येईल. प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात असून प्रवेश व नोंदणीसाठी ऑलकार्गो कौशल्य विकास केंद्र सेक्टर 30, द्रोणागिरी नोड, केअर पॉईंटसमोर बोकडवीरा, उरण, जिल्हा रायगड यांच्याशी साधावा.

तक्का येथे योग दिन साजरा

पनवेल ः जागतिक योग दिनाच्या निमित्ताने अंबिका कुटीरच्या सहयोगाने गोरदेज स्काय गार्डन सोसायटी, क्लब हाऊस तक्का गाव येथे आरोग्य जागृती व योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नगरसेवक अजय बहिरा, डॉ. मुकादम यांनी योगाविषयी माहिती दिली. क्लब हाऊस, गोदरेज स्काय गार्डन सोसायटी येथे झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेवक अजय बहिरा, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. मुकादम आदी उपस्थित होते.

Check Also

रायगड जिल्ह्यात एकूण 69.04 टक्के मतदान

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात 69.04 टक्के …

Leave a Reply