नागोठणे : शहरासह विभागात पावसाची संततधार चालूच असून गेल्या चोवीस तासात नागोठणे शहरात 190 मि. मी. पावसाची नोंद झाली असल्याची माहिती तलाठी अनंत म्हात्रे यांनी दिली. रात्रभर पडलेल्या पावसाने नागोठणे – पोयनाड मार्गावर कडसुरे – कुहिरे गावांदरम्यान रस्त्यावर पाणी साचल्याने सकाळी सहा – सात वाजण्याच्या दरम्यान रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. येथील अंबा नदी दुथडी भरून वाहत असल्याने पावसाचे प्रमाण अधिक वाढले तर, पुराची शक्यता नाकारता येत नाही.
Check Also
कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत सीकेटीच्या स्वस्तिका घोषची सुवर्णझेप
पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स …
RamPrahar – The Panvel Daily Paper