Breaking News

उरण पालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा

उरण ः प्रतिनिधी

उरण नगर परिषदेच्या हद्दीतील नागाव रोडवरील इमारतींच्या समोरच अडथळा निर्माण करणारी 18 अनधिकृत वाढीव गाळ्यांची अतिक्रमणे उरण नगर परिषदेने बुलडोझर लावून हटवली. यामध्ये काही गॅरेज, भाजीची दुकाने, टपर्‍यांंचा समावेश आहे.

उरण नगर परिषदेच्या हद्दीतील नागाव रोडवरील इमारतींच्या समोरच अनेक गाळेधारकांनी अनधिकृतपणे वाढीव बांधकामे केली होती. अनधिकृतपणे उभारण्यात आलेले हे पत्र्याचे शेड, टपर्‍या, दुकाने, गॅरेज आदींमुळे रहदारीस अडथळा करत होते. याबाबत नागरिकांच्या तक्रारीही उनपकडे प्राप्त झाल्या होत्या.

येथील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अवधुत तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता अनुप कांबळे, उपअभियंता झेड. आर. माने यांच्या पथकाने अडथळा निर्माण करणारी 18 अनधिकृत वाढीव अतिक्रमणे काल बुलडोझर लावून हटवली असल्याची माहिती अभियंता अनुप कांबळे यांनी दिली.

Check Also

36 घंटे @50; दीड दिवसाचे थरार नाट्य

हिंमत सिंह (सुनील दत्त), त्याचा भाऊ अजित सिंह (रणजीत) आणि या दोघांचा साथीदार दिलावर खान …

Leave a Reply