Breaking News

राष्ट्रवादीचे अलिबाग तालुका अध्यक्ष मनोज धुमाळ यांचा राजीनामा

अलिबाग : प्रतिनिधी 

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती सुरूच आहे. राष्ट्रवादीचे अलिबाग तालुका अध्यक्ष मनोज धुमाळ आणि त्यांचे वडील राष्ट्रवादीचे जिल्हा सल्लागार प्रकाश धुमाळ या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे.

लोकसभा निवडणूक निकालानंतर मनोज धुमाळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार अशी चर्चा सुरू होती, मात्र काही दिवस त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती. अखेर बुधवारी मनोज व प्रकाश धुमाळ या दोघांनीही आपल्या पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा सुनील तटकरे तसेच जिल्हाध्यक्ष दत्ताजी मसुरकर यांच्याकडे पाठवून दिला आहे.

आघाडीचा धर्म पाळताना अलिबाग तालुक्यात पक्षवाढीसाठी पक्षश्रेष्ठींकडून कोणतेही प्रयत्न झालेले दिसत नाहीत. त्यामुळे पक्षात राहून काम करणे शक्य नाही. अशा वेळी पक्षातील मानाचे स्थान अडवून ठेवणे आपल्या तत्त्वात बसत नसल्याने आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे मनोज धुमाळ यांनी आपल्या

राजीनामापत्रात नमूद केले आहे.

दुसरीकडे प्रकाश धुमाळ यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. प्रकाश धुमाळ हे रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसाळकर, उपाध्यक्ष संतोष निगडे यांनी यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply