खालापूर : प्रतिनिधी – लौजी व खोपोली स्थानका दरम्यान असणार्या फाटकाजवळ सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक महाकाय वृक्ष रेल्वे रुळांवर कसळला. त्यामुळे कर्जत -खोपोली रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
खालापूर, खोपोली परिसरात दोन दिवस संततधार पडत असून, त्यामुळे रेल्वे व महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सोमवारी सकाळी रेल्वे मार्गावर झाड पडल्याने कर्जत-खोपोली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वे कर्मचारी व खोपोली नगर पालिका कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नानंतर हे झाड बाजूला करण्यत आले. त्यानंतर या मार्गावरील रेल्वे सेवा पूर्ववत सुरू झाली. या दरम्यान रेल्वे प्रवाशांचे हाल झाले.