Breaking News

गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त  – श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने इयत्ता पहिली ते दहावीच्या गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवीन पनवेलमधील साई मंदिर आणि विठ्ठल रखुमाई मंदिरात वह्यावाटपाचा कार्यक्रम रविवारी (दि. 7) झाला.

नवीन पनवेलमधील सेक्टर 13 मधील साई मंदिर आणि विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने इयत्ता पहिली ते दहावीच्या गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले. हा कार्यक्रम नगरसेविका सुशीला घरत यांच्या अध्यक्षतेखाली झाला असून, याचा लाभ अनेक गरजूंनी घेतला. या वेळी जगदिश घरत, विजय म्हात्रे, सी. सी. भगत, अनंत ठाकूर, राजाराम शिंदे, गजानन कडू, मयुरी उनकर, लक्ष्मी चव्हाण, शारदा माने, गौरी पवार, शोभा पनाडे, संदीप पाटील, अनिता ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

अनुसूचित जमातीच्या विशेष पदभरतीचा प्रश्न विधिमंडळात!

प्रलंबित भरती तातडीने पूर्ण करण्याची आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी मुंबई …

Leave a Reply