Breaking News

रोटरॅक्ट क्लब पनवेलचा पदग्रहण सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

नवीन पनवेल येथील रोटरी कम्युनिटी सेंटरमध्ये रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचा चौथा पदग्रहण सोहळा बुधवारी झाला. या सोहळ्यात 2019-20 साठी क्लबच्या अध्यक्षपदाची धुरा रोटरॅक्टर अ‍ॅड. तेजल नाईक आणि क्लब सचिव  जमिला व्होरा व त्यांच्या संपूर्ण टीमकड मावळते अध्यक्ष रोटरॅक्टर शुळाम मालपाणी यांनी सोपवली तसेच या वेळी या वर्षाचा पहिला अंक ‘क्षितीज’ यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पदग्रहण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या रोटेरीयन अ‍ॅड.  शुभांगी झेमसे, विशेष अतिथी रोटरॅक्ट डिस्ट्रीक्टचे डीआरआर अक्षय मोरे, पुण्याहुन डिस्ट्रीक्टचे पास्ट डीआरआर अर्जुन देव, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचे अध्यक्ष डॉ. प्रकाश पाटील, सचिव रोटेरियन हितेश रजपुत, कल्पेश परमार, इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री पाटील, सचिव कल्पना नागावकर व इतर रोटरॅक्ट क्लबचे  सभासद आदी उपस्थित होते.

Check Also

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …

Leave a Reply