पनवेल : रामप्रहर वृत्त
सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे
यंदाही आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. या
महाशिबिराच्या नियोजनासंदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी
(दि. 20) खांदा कॉलनीमधील सीकेटी महविद्यालयात आढावा बैठक झाली. या वेळी विविध कमिट्यांचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीस महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य तथा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, मुग्धा लोंढे, वृषाली वाघमारे, विद्या गायकवाड, राजेश्री वावेकर, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे आदी उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महाशिबिर सुरळीत व्हावे आणि सर्वनागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा यासाठी नियोजनबद्ध काम करावे, अशी सूचना केली. अरुणशेठ भगत यांनीही मनोगत व्यक्त केले.
आरोग्य महाशिबिराच्या नियोजनासाठी 24 समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक समितीला वेगवेगळी कामे देण्यात आली असून, महाशिबिर कसे नियोजनबद्ध होईल याबाबत बैठकीत सूचना देण्यात आल्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper