![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/07/ravi-patil-1-1024x768.jpg)
नागोठणे ः प्रतिनिधी
विकासाचा ध्यास असणार्या रविशेठ पाटील यांच्यासारख्या व्यक्तीला पराभूत करण्याचा नेहमीप्रमाणे प्रयत्न चालला आहे, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. रविशेठना निवडून आणणे काळाची गरज असून हेवेदावे विसरून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन मारुती देवरे यांनी केले. नागोठणे विभागीय भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी (दि. 23) सायंकाळी चिकणी येथे पार पडली. त्या वेळी मार्गदर्शनपर भाषणात देवरे बोलत होते. या वेळी रोहे तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर, सरचिटणीस आनंद लाड, विभागीय अध्यक्ष मोरेश्वर म्हात्रे, प्रकाश मोरे, रऊफ कडवेकर, विठोबा माळी, सचिन मोदी, फातिमा सय्यद, सिराज पानसरे, संतोष लाड, सुभाष पाटील, शेखर गोळे, रामचंद्र देवरे, खंडू ठाकूर, राजाराम देवरे, विजय गोळे, रामचंद्र धामणे, राजेंद्र देवरे, अल्ताफ पानसरे, सुरेश देवळे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.