नवी दिल्ली : प्रदीर्घ चर्चेनंतर तिहेरी तलाक विधेयक गुरुवारी (दि. 25) लोकसभेत मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 303; तर विरोधात 82 मते पडली. लोकसभेत तिहेरी तलाकवर जोरदार चर्चा झाली. विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना विधेयकाचे जोरकसपणे समर्थन केले. येथे कोणतेही राजकारण, धर्म वा समुदायाचा प्रश्न नसून महिलांना सन्मान आणि न्याय देण्यासाठी, तसेच महिलांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठीच हे विधेयक सरकारने आणले आहे, असे प्रसाद यांनी नमूद केले. चर्चेनंतर आवाजी मतदान घेण्यात आले. याआधीही तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर झाले होते, मात्र राज्यसभेत बहुमत नसल्याने ते पारित होऊ शकले नव्हते. आता हे विधेयक मंजुरीसाठी पुन्हा एकदा राज्यसभेत पाठविण्यात येणार आहे.
Check Also
केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा
पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …
RamPrahar – The Panvel Daily Paper