कर्जत : बातमीदार
तालुक्यातील झुगरेवाडीमधील शंकर गोमा झुगरे यांचे राहते घर शनिवारी वादळी वार्यात कोसळले. त्या वेळी शंकर झुगरे घरात झोपले होते, मात्र किमान तासभर गावातील लोकांना त्याबाबत काहीही माहिती नव्हती. शेवटी घराची कोसळलेली कौले उचलत असताना स्थानिकांना त्याबाबत माहिती झाली आणि झोपलेल्या झुगरे यांना बाहेर काढण्यात आले. त्यांच्या घराच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा ओलमण ग्रामपंचायतीकडून करण्यात आला. महसूल विभागानेही कळंब येथील मंडळ अधिकार्यांना पाठवून पडलेल्या घराचा पंचनामा करून घेतला आहे.