Breaking News

महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना कर्जत रेल्वे पॅसेंजर असो. सदस्यांची मदत

कर्जत : बातमीदार

वांगणी-बदलापूर दरम्यान अडकून पडलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शनिवारी अनेकांचे हात पुढे आले होते. त्यात कर्जत पॅसेंजर असोसिएशनचे अनेक सदस्य या मोहिमेत सहभागी झाले होते. राजाभाऊ कोठारी यांनी आपल्या सहकार्‍यांसह मोहीम राबवून अनेकांना सुखरूप बाहेर काढले.

वांगणी ते बदलापूर दरम्यान चोहोबाजूंनी पाण्याने वेढलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी कर्जत येथून चार शिलेदार जीवाची पर्वा न करता घटनास्थळी पोहचले होते. त्यांनी एनडीआरएफ जवानांच्या सहकार्याने 30 ते 35 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यातील कर्जतमधील प्रवाशांना आपल्यासोबत घरी घेऊन आले. सदर मदत कार्यात कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे विनोद पांडे, गणेश म्हस्कर, जयवंत म्हसे व सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी सहभागी झाले होते. शहरातील जैन समाज बांधव, रोटरी क्लब, व्यापारी असोसिएशनच्या सदस्यांनी कर्जत रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांना धीर देऊन चहा, नाश्ता, बिस्किट आणि जेवण दिल्याने कर्जतकरांच्या माणुसकीचे दर्शन पाहण्यास मिळाले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply