Breaking News

पीरकोनचा तुषार म्हात्रे ठरला सर्वोत्कृष्ट लेखक

उरण ः प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्ती उपक्रमांतर्गत मराठी भाषा दिनानिमित्ताने लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयीन गट, शिक्षक गट आणि खुला गट अशा गटांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. अलीकडेच या स्पर्धेचा निकाल लागला असून रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, जूचंद्र येथील तुषार म्हात्रे यांना शिक्षक गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. ‘मराठी ही ज्ञानाची भाषा होऊ शकते’ हा त्यांचा लेख या गटामध्ये सर्वोत्कृष्ट ठरला. प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या विशेष पारितोषिकाबद्दल जूचंद्र विद्यालयाद्वारे त्यांचा सन्मान करण्यात आला. तुषार म्हात्रे हे उरण तालुक्यातील पीरकोन येथील रहिवासी असून त्यांच्या लेखनाला यापूर्वीही विविध प्रकारचे सन्मान मिळाले आहेत. त्यांच्या ‘तुषारकी’ ब्लॉगला एबीपी माझाच्या ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेत परीक्षकांनी विशेष पारितोषिक देऊन गौरवले. या यशाबद्दल पीरकोन ग्रामस्थ तसेच सहकार्‍यांनी कौतुक केले आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply