Breaking News

गव्हाण विद्यालयात विद्यार्थ्यांनी केले आकर्षक दिवे

गव्हाण : रामप्रहर वृत्त

येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये सालाबादप्रमाणे या वर्षीही दीप अमावास्येनिमित्त विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून विविध आकारांचे आकर्षक दिवे तयार केले. या अत्यंत देखण्या व आकर्षक दिव्यांचे प्रदर्शन या वेळी आयोजित करण्यात आले होते.

या दीप प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांचे हस्ते करण्यात आले. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे, पर्यवेक्षक तथा संस्थेचे लाइफ वर्कर अरुण घाग, रयत को-ऑप. बँकेचे संचालक तथा संस्थेचे लाइफ वर्कर प्रमोद कोळी, अटल टिंकरिंग प्रयोगशाळा प्रमुख रवींद्र भोईर, ज्येष्ठ शिक्षक विजय म्हात्रे, गुरुकुल प्रमुख संदीप भोईर, सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्योत्स्ना ठाकूर, तसेच सर्व सेवक आणि विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

काला पानी @ ६८; राज खोसला आणि देव आनंद जोडीची रहस्यरंजकता…

दिग्दर्शक राज खोसला यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. जन्म ३१ मे १९२५. आणि मृत्यू ९ …

Leave a Reply