Breaking News

जय बजरंग! ; तबिलिसी ग्रांपीत सुवर्णपदक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारताच्या दोन आघाडीच्या पहेलवानांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी करीत आपली लय कायम राखली. बजरंग पुनिया याने तबिलिसी ग्रांपीमध्ये सुवर्णपदक पटकाविले, तर विनेश फोगाट हिने मेदवेद कुस्ती स्पर्धेत चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.

जॉर्जियामध्ये खेळल्या गेलेल्या तबिलसी ग्रां.पी.मध्ये गेल्या वर्षी सुवर्णपदक जिंकणार्‍या बजरंग याने पुरुषांच्या फ्री स्टाईल कुस्तीमध्ये अंतिम सामन्यात इराणच्या पेइमन बिब्यानीला 2-0 अशी मात दिली.बेलारुसच्या मिन्स्कमध्ये मेदवेद कुस्ती स्पर्धेत विनेश हिने महिलांच्या 53 किलो गटात स्थानिक पहेलवान याफ्रेमेनका हिला एकतर्फी झालेल्या सामन्यात 11-0 असे पराभूत केले.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply