Breaking News

टेटे स्पर्धेत आदिती जाधव, सिद्धार्थ गुब्बाला यांचा बोलबाला

पनवेल : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळाच्या वतीने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन नुकतेच नवीन पनवेल सेक्टर 18 येथील सिडको समाज मंदिरात करण्यात आले होते. 297 खेळाडूंनी सहभाग घेऊन या स्पर्धेस उत्तम प्रतिसाद दिला.

स्पर्धेचे बक्षीस वितरण रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते संजय कडू, तसेच सचिन नाईक यांच्या हस्ते झाले. स्पर्धेसाठी मुख्य पंच डी. आर. साळसकर, सहाय्यक पंच पराग अंकोलेकर व राजेश कुरबेट यांनी काम केले.

स्पर्धेचा गटनिहाय निकाल (विजेते व उपविजेते)

नवोदित : मुली-तनिक्षा प्रशांत मोकल डीएव्ही स्कूल नवीन पनवेल, स्वस्ती सचिन भोईर सेंट जोसेफ हायस्कूल नवीन पनवेल; मुले-शिवेश तांबोळी डीएव्ही स्कूल नवीन पनवेल, हर्षद अनिल कुदळे सेंट जोसेफ हायस्कूल नवीन पनवेल, 10 वर्षांखालील : मुली – मनाली चिलेकर सीकेटी स्कूल नवीन पनवेल, तनिक्षा मोकल, मुले-हर्षद कुदळे, अथर्व हांड डॉन बॉस्को पब्लिक स्कूल; 12 वर्षांखालील : मुली-आदिती जाधव डीएव्ही स्कूल नवीन पनवेल, अनिशा पात्रा डीएव्ही इंटरनॅशनल स्कूल खारघर, मुले-सिद्धार्थ गुब्बाला डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल नेरूळ, स्वस्तिक कुंडू डीएव्ही स्कूल नवीन पनवेल; 14 वर्षांखालील  : मुली-आदिती जाधव, रित राजेंद्र शर्मा सेंट जोसेफ हायस्कूल नवीन पनवेल, मुले-सिद्धार्थ गुब्बाला, तुषार खांडेकर बालभारती स्कूल खारघर; 17 वर्षांखालील : मुली-आदिती जाधव, अनिशा पात्रा, मुले-राहुल सारडे एसआयइएस नेरूळ, वेदांत मोकाटी बालभारती स्कूल खारघर; युथ : मुली-अनिशा पात्रा, अन्वी इंगळे नवीन पनवेल, मुले-सिद्धार्थ गुब्बाला, आदित्य मित्रा पनवेल; महिला एकेरी : संस्कृती शर्मा, आदिती जाधव, पुरुष एकेरी : विजय सिंग रावत तळोजा, राहुल सारडे एसआयइएस नेरूळ; 12 वर्षांखालील दुहेरी : मुली-अवनी राजेश कुरबेट डीएव्ही स्कूल नवीन पनवेल व मनाली चिलेकर सीकेटी हायस्कूल नवीन पनवेल, इशा महावीर जाधव व तनिक्षा मोकल डीएव्ही स्कूल नवीन पनवेल, मुले-सिद्धार्थ गुब्बाला व स्वस्तिक कुंडू, मांगल्य खानावकर व श्यामंतक ढवळे डीएव्ही स्कूल नवीन पनवेल; 14 वर्षांखालील दुहेरी :

मुले- सिद्धार्थ गुब्बाला व तुषार खांडेकर, सोहम लोध डीपीएस पळस्पे व अर्जुन बिश्वास डीएव्ही स्कूल नवीन पनवेल; महिला दुहेरी : आदिती जाधव व अनिशा पात्रा, अन्वी इंगळे व संस्कृती शर्मा डीएव्ही स्कूल नवीन पनवेल, पुरुष दुहेरी : अमित दशमाना नवी मुंबई व युगान्त श्रीवास्तव नवी मुंबई, आदित्य मित्रा पनवेल व निखिल म्हात्रे नवीन पनवेल; ज्येष्ठ : जयदीप मिश्रा नवी मुंबई, दिनकर चंदन नवी मुंबई. डॉक्टर्स ग्रुप : डॉ. शैलेश शर्मा नवीन पनवेल, डॉ. फिरोज मुल्ला पनवेल.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply