Breaking News

उरणमधील डॉक्टरांची पूरग्रस्त भागात सेवा

उरण ः वार्ताहर

उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजीव म्हात्रे यांनी सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांच्या मदतीच्या अवाहनाला तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन औषधोपचारासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून औषधे व जीवनावश्यक गोष्टींचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. गरज असेल तिथे जाऊन ते उपचार सुरू करीत आहेत, तसेच मदतही करीत आहेत. सध्या ते अमनापूर-पुलूस, सातारा येथे रुग्णांची सेवा

करीत आहेत. मेडिकल कॅम्पमध्ये अध्यक्ष डॉ. संजीव म्हात्रे, डॉ. सुरेश पाटील, डॉ. मनोज भद्रे, डॉ. अजय कोळी, डॉ. घनःशाम पाटील, डॉ. सत्या ठाकरे, वैष्णवी माता मच्छीमार सोसायटीचे चेअरमन मार्तंड नाखवा यांंचा समावेश आहे.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply