Breaking News

अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अमृत संस्थेची स्थापना

मुंबई : प्रतिनिधी

खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी अमृत (अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च, युप्लिफ्टमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग) ही संस्था स्थापन करण्यास मंगळवारी (दि. 20) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर या स्वायत्त संस्थेची निर्मिती होणार असून, त्यात मराठा समाजातील तरुणांच्या विकासासाठी विशेष कार्य केले जाणार आहे.

‘केमट्रॉन’ला खालापुरात जमीन देण्यास मान्यता

रायगड जिल्ह्यातील डोणवत (ता. खालापूर) येथे केमट्रॉन सायन्स लॅबोरेटरीजला औद्योगिक कारणासाठी जमीन देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. संबंधित कंपनीस डोणवत येथील सर्व्हे क्रमांक 93 अ/1मधील 0.64 हे. आर. इतकी जमीन विनालिलाव कब्जेहक्काने दिली जाणार आहे. यासाठी प्रचलित वार्षिक मूल्यदर विवरणपत्रानुसार होणारे मूल्य वसूल केले जाणार आहे.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply