
उरण ः वार्ताहर
उरण नगर परिषद यांच्या वतीने कृष्ण जन्माष्टमी शनिवारी (दि. 24) सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत महाराष्ट्र भूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी उरण नगर परिषद मराठी शाळा क्र. 1 व 2, पेन्शनर पार्क, उरण येथे साजरी होणार आहे.
उरण तालुक्यातील गोविंदा पथकांना आर्थिक मदत म्हणून सलामी देणार्या गोविंदा पथकास अकरा हजार रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे, असे नगराध्यक्षा सायली सविन म्हात्रे यांनी सांगितले. या वेळी उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, नगरसेवक तथा शिक्षण सभापती रवी भोईर, उरण शहर भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगरसेविका प्रियंका पाटील, दमयंती म्हात्रे, रजनी कोळी, आशा शेलार, यास्मिन गॅस, स्नेहल कासारे, जान्हवी पंडित, नगरसेवक राजेश ठाकूर, नंदू लांबे, धनंजय कडवे, मेराज शेख, तुषार ठाकूर तसेच कर्मचार्यांचे सहकार्य लाभणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper