Breaking News

मंदिराचा भाग कोसळून चौघांचा मृत्यू

कोलकाता ः वृत्तसंस्था

पश्चिम बंगालमध्ये जन्माष्टमीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. मंदिराचा काही भाग कोसळल्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 27 जण जखमी झाले आहेत. 24 उत्तर परगना जिल्ह्यातील कोचुआ गावात बाबा लोकनाथ मंदिरामध्ये ही घटना घडली. या मंदिरामध्ये जन्मोत्सव साजरा करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. या वेळी मंदिराचा भाग कोसळल्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवासाठी अनेक भाविक मंदिरात जमले होते. उत्सव सुरू असतानाच अचानक मंदिराचा भाग कोसळला. भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे त्यांनी सैरभर पळण्यास सुरुवात केली. उपस्थित पोलिसांनी काही भाविकांच्या मदतीने ढिगार्‍याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी संबंधित आधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची, तर गंभीर जखमी झालेल्यांना एक लाख आणि किरकोळ जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदत पश्चिम बंगाल सरकारने जाहीर केली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply