Breaking News

सप्तस्वरांच्या सरीत रोहेकर चिंब भिजले

रोहे : प्रतिनिधी

रोह्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टच्या भाटे वाचनालयातील गणेशोत्सवात रविवारी (दि. 8) रात्री ‘सप्तस्वरांच्या पाऊलखुणा‘ हा सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्याला दर्दी रोहेकरांकडून भरभरून दाद मिळाली.‘सूर निरागस हो‘ या गाण्याने सुरू झालेल्या या मैफिलीत गायक नचिकेत देसाई, ओमकार प्रभुघाटे, अमेय ठाकूर देसाई, झंकार कानडे, सिद्धार्थ कदम, गायिका केतकी चैतन्य यांनी मराठी व हिंदीतील अनेक गाणी रसिकांसमोर सादर केली. सौरभ सोवनी यांनी या कार्यक्रमाचे सुरेख निवेदन केले. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला‘ या अजरामर रचनेने या रंगलेल्या मैफिलीची सांगता करण्यात आली.

Check Also

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …

Leave a Reply