पेण : प्रतिनिधी
निगडी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुनंदा नाईक व माजी सदस्य जनार्दन गणपत नाईक यांच्या नेतृत्वाखाली शेकाप कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 11) माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या पेण येथील निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला.
पेण तालुक्यातील निगडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जनार्दन गणपत नाईक व त्यांच्या पत्नी माजी सरपंच सुनंदा जनार्दन नाईक यांच्या नेतृत्वाखाली तुकाराम चिमा नाईक, सुनिल नाईक, यशवंत ठाकूर, तालुका उपाध्यक्ष वासुदेव म्हात्रे, जिल्हा परिषद गट अध्यक्ष हिरामण शिमग्या नाईक, एकनाथ चिमा नाईक, मनोज हिरामण नाईक, सुमित नाईक, रघुनाथ नाईक, सूर्यास कानू नाईक, दुधाजी जनक नाईक, विश्वास चंद्रकांत नाईक, करण संतोष नाईक, गुलाब नाईक, शशी नाईक, जयवंती नाईक, निर्मला नाईक, माही नाईक, राजेश्री नाईक, सुरेश नाईक आणि शकुंतला म्हात्रे या शेकापच्या निगडी येथील कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या ठिकाणी शेकापला जोरदार धक्का बसला आहे. या वेळी भाजपत दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे रविशेठ पाटील यांनी स्वागत केले.