Breaking News

खारघरमध्ये सोसायट्यांना कचरापेटीचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांच्या नगरसेवक निधीतून खारघर सेक्टर 11 मधील विविध सोसायट्यांना कचरापेटीचे वाटप करण्यात आले. यामध्ये शंखेश्वर हाईट्स प्लॉट नं 06, वैभवशाली को. ऑप. हौसिंग सोसायटी प्लॉट नं 05, श्रीबालाजी हौसिंग सोसायटी प्लॉट नं 73/ए, शिवम हौसिंग सोसायटी प्लॉट नं 73/बी, नम्रता हौसिंग सोसायटी प्लॉट नं 73, श्रीगणेश समन्वय हौसिंग सोसायटी प्लॉट नं 12/13 आदी सोसायट्यांचा समावेश आहे.

या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक रामजी बेरा, प्रभाग अ समिती सभापती शत्रुघ्न काकडे, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, मोना अडवाणी, सौ. झाकड, अंकिता वारंग, चांदणी अवघडे, दीपक बनकर, रोहिणी अमराले, सुजित म्हात्रे, भाजप कार्यकर्ते आणि खारघर सेक्टर 11 मधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

अमिताभ बच्चन ‘न दिसलेला, न पाहिलेला’

आज ११ ऑक्टोबर २०२६ शहेनशहा अमिताभ बच्चनचा ८४वा वाढदिवस आणि या वयातही कार्यरत. या अष्टपैलू …

Leave a Reply