Breaking News

‘स्वच्छता हीच सेवा’ पनवेल महापालिकेतर्फे महास्वच्छता रॅली

पनवेल ः रामप्रहर वृत्त

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेमध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2020 प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दिनांक 11 सप्टेंबर ते 27 ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. प्लास्टिकमुक्त पनवेल शहर व घनकचरा वर्गीकरण यावर भर देत नागरिकांना आवाहन करण्यात

येत आहे.

या पार्श्वभूमीवर पनवेल महानगर पालिकेमार्फत इन्फिनिटी फाऊंडेशन आणि आय. टी. एम. कॉलेज, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने व आयुक्त गणेश देशमुख व अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जनजागृतीपर  महास्वच्छता रॅलीचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज भुजबळ, नगरसेविका राजश्री विवेकर, सहायक आयुक्त शाम पोशेट्टी, मुख्यलेखाधिकारी मनोजकुमार शेट्टे, स्वच्छ भारत अभियानच्या वरिष्ठ सल्लागार मधुप्रिया आवटे, प्रभाग अधिकारी श्रीराम हजारे, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, कनिष्ठ सल्लागार सदाकत अली व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply