Breaking News

भाजप चिर्ले जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

उरण ः रामप्रहर वृत्त

उरण तालुक्यातील भारतीय जनता पार्टी शाखा चिर्ले येथे भाजपचे उरण तालुका चिटणीस निळकंठ घरत यांच्या जनसंपर्क कार्यलयाचा उद्घाटन सोहळा रविवारी (दि. 15) झाला. या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. तसेच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या कार्यालयास भेट देऊन निळकंठ घरत यांना शुभेच्छा दिल्या.

उरण तालुक्यातील चिर्ले येथे निळकंठ घरत यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, चटणीस चंद्रकांत घरत, उरण तालुका अध्यक्ष रवि भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, कामगार नेते जितेंद्र घरत, उरण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, शशिकांत पाटील, सरचिटणीस सुनिल पाटील, प्रसाद पाटील, खजिनदार संदीप पाटील, चिर्ले भाजपचे अध्यक्ष संतोष मढवी, जासई विभागीय अध्यक्ष मेघनाथ म्हात्रे, चिरनेर विभागीय अध्यक्ष कुलदीप नाईक, तेजस पाटील, समीर मढवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply