Breaking News

उरण नगर परिषदेच्या साखरचौथ गणपतीचे विसर्जन

उरण : प्रतिनिधी

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उरण नगर परिषदेमध्ये अधिकारी, कर्मचारी वर्गातर्फे दीड दिवसाचे साखरचौथ गणपती बसविण्यात आले होते. नगर परिषदेमधील दीड दिवसाच्या साखरचौथ गणपतीचे उरण शहरातील विमला तलावात मोठ्या थाटामाटात विसर्जन करण्यात आले.

या साखरचौथ गणपतीचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, वरिष्ठ लिपिक के. जी. जाधव, महेश लवटे, अभियंता झुंबर माने, अभियंता अनूपकुमार कांबळे, संतोष पवार आदी नगर परिषदचे अधिकारी, कर्मचारी यांनी दर्शन घेतले. या वेळी दीड दिवसाच्या काळात नगर परिषदेमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. उरण नगर परिषदेच्या साखरचौथ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, उपाध्यक्ष मनोज ओव्हाळ, उपाध्यक्ष विशाल स्वामी, यादव ममताबादे, माधव सिद्धेश्वरे, गजानन कोळी, सचिन नांदगांवकर, हंसराज महाडिक, नरेश खेदू, नितिन कासारे, मिलिंद जाधव, रवी म्हात्रे, दिलीप म्हात्रे, मधुकर भोईर, दीपक कांबळे, संजय पवार, विजय पवार, संतोष तेलंगे, जितेंद्र पाडावे, सदानंद म्हात्रे, दीपक गुडेकर, जयेश वत्सराज, नितिन चौधरी, राजू जाधव, संतोष कांबळे, प्रशांत पाटील, नरेंद्र उभारे, नवनाथ इंगळे, राजेश कदम, संतोष गुडेकर, सुनील कुंभार आदी कर्मचार्‍यांनीही गणेशाचे दर्शन घेतले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply