Breaking News

म्हात्रे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

उरण : प्रतिनिधी

आयईएस जवाहरलाल नेहरू विद्यालयात आयोजित  तालुकास्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत उरण तालुक्यातील आवरे येथील रामचंद्र म्हात्रे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. त्यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

स्पर्धेत म्हात्रे विद्यालयाची समीक्षा गावंड हिने थाळीफेकमध्ये प्रथम व गोळाफेकमध्ये द्वितीय, मन म्हात्रे याने थाळीफेकमध्ये प्रथम, ॠतिक पाटीलने उंच उडीत प्रथम, तर विनंती चव्हाण हिने उंच उडीत प्रथम क्रमांक पटकाविला, तसेच लांब उडी व धावणे या क्रीडा प्रकारात यश मिळविले.

विद्यालयाचे प्राचार्य श्री. गायकवाड, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक बी. एस. जाधव, कल्पना म्हात्रे यांचे अभिनंदन केेले.

Check Also

अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन्‌‍ बोलके राहा!

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …

Leave a Reply