Breaking News

रोटरी क्लब ऑफ पनवेल एलाईटतर्फे 30 घरांमध्ये सोलर लाईटची व्यवस्था

पनवेल ः वार्ताहर

रोटरी क्लब ऑफ पनवेल एलाईटच्या सदस्यांनी पेण तालुक्यातील अतिशय दुर्गम आदिवासी भागातील शिंदळाचीवाडी व तिलोरे आदिवासी वाडी व खरबाची वाडी या ठिकाणी ज्या घरांमध्ये, झोपड्यांमध्ये विजेची सोय नाही, अशा 30 घरांमध्ये सोलर लाईटची व्यवस्था केली. यासाठी जितो, नवी मुंबई चॅप्टरने मदत केली. तसेच राजमाची व तिलोरे आदिवासी वाडीमध्ये सर्वांसाठी कपड्यांचे वाटप केले. या भागातील आदिवासी विद्यार्थी ज्यांना शाळेत तीन ते आठ कि.मी. पायीच जावे लागते, त्यांना 25 सायकली भेट दिल्या. यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल एलाईटचे प्रेसिडेंट रितेश मुनोत व सेक्रेटरी राज मुनोत व सदस्यांनी तसेच रोट्रॅक्ट क्लब ऑफ पनवेल एलाईटच्या प्रेसिडेंट रिया मुनोत व सेक्रेटरी ध्रुव जैन व सदस्यांनी  परिश्रम घेतले. पेण आरसीसी बोरगाव एलाइटचे प्रेसिडेंट सुरेंद्र व्यवहारे व सदस्यांनी बहुमोल मदत केली.

Check Also

नतनोत्सवाने पनवेलमध्ये रंगला कलेचा सुरेल जल्लोष

नगरसेवक परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तसांस्कृतिक कलेचा वारसा जपणाऱ्या नृत्यार्पण फाईन …

Leave a Reply