Breaking News

नवी मुंबईच्या धान्य बाजार आवारात लसीकरण केंद्र; आमदार मंदा म्हात्रे यांचे प्रयत्न

नवी मुंबई : प्रतिनिधी

एपीएमसी बाजार आवारातील 18 ते 45 वर्षांपर्यंतच्या व्यापारी, माथाडी कामगार, गुमास्ता वर्ग अशा सर्व घटकांना थेट लसीकरणाचा लाभ घेता यावा, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने निलेश वीरा फाउंडेशन व कच्छी भानुशाली समाज यांच्या सौजन्याने एमजीएम हॉस्पिटल, वाशी यांच्या माध्यमातून वाशी येथील एपीएमसी घाऊक धान्य बाजार ग्रोमा सेंटर आवारात कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. या वेळी ग्रोमा सेंटरचे संचालक निलेश वीरा, एपीएमसीचे माजी संचालक शंकरशेठ पिंगळे, शरद मारू, महेंद्र गजरा, भीमजी भानुशाली, अमृत जैन, जयंत गंगर, शशी भानुशाली, पाशाभाई, डॉ. राजेश गव्हाणे, डॉ. श्याम यंपल्ले उपस्थित होते. या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी नवी मुंबई येथे घाऊक धान्य बाजार, भाजीपाला मार्केट, फळ बाजार, कांदा-बटाटा मार्केट येथे दररोज हजारो कामगार, व्यापारी व्यवसायानिमित्त काम करण्यासाठी येत असतात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. भाजीपाला बाजारातही 18 ते 45 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींकरिता कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. लसीकरण केंद्र उपलब्ध केल्याबद्दल ग्रोमा सेंटरचे सर्व व्यापारी आणि कामगारांनी आमदार मंदा म्हात्रेंचेे आभार मानले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply