Breaking News

नवी मुंबईत काँग्रेसला खिंडार ; दशरथ भगत समर्थकांसह भाजपमध्ये

नवी मुंबई : प्रतिनिधी

काँग्रेसचे नेते, नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी सहकार्‍यांसह गुरुवारी (दि. 3) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे नवी मुंबईत काँग्रेसला खिंडार पडले आहे.

वाशी येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे नेते संजय उपाध्याय, माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत आदी उपस्थित होते. 

पक्षप्रवेशकर्त्यांनी नावे

नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, काँग्रेस अनुसूचित जाती जमाती विभागाचे माजी अध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्य अंकुश सोनावणे, वाशी ब्लॉक अध्यक्ष विजय वाळुंज, युवक काँग्रेसचे नवी मुंबई अध्यक्ष निशांत भगत, बेलापूर विधानसभा अध्यक्ष अनिकेत देशमुख, ऐरोली विधानसभा अध्यक्ष उमेश जूनबरे, ठाणे जिल्हा एनएसयूआय संघटनेचे अध्यक्ष मनोज महाराणा, काँग्रेस नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस संजय यादव, सुरज देसाई, उपाध्यक्ष अरुण राजगुरू, सचिव सचिन ढेरे, विष्णू मेढकर, युवक काँग्रेसचे आवळा-माजिवडा विधानसभा अध्यक्ष महेश म्हात्रे, नवी मुंबई सरचिटणीस सचिन शिंदे, एकवीरा रिक्षा चालक-मालक युनियनचे कार्याध्यक्ष विजय पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अजय वाळुंज, तसेच महादू थोरात, आदिल शेख, रोनक छेडा, दीपक तारी, वसंत अहिरे, राजेश पाटील, संतोष पाटील, आशिष साळवे.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply