Breaking News

उरण विधानसभा मतदारसंघातून महेश बालदी आज अर्ज भरणार

उरण : वार्ताहर

जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी शुक्रवारी (दि. 4) आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उरण विधानसभा मतदारसंघात विकासकामांच्या जोरावर त्यांनी झंझावात निर्माण केला आहे.

आमदार नसतानाही महेश बालदी यांनी कोट्यवधी रुपयांची कामे करून जनतेची मने जिंकली आहेत. त्यामुळे त्यांना जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून, त्यांचा विजय निश्चित असल्याची खात्री महेश बालदी मित्र मंडळाच्या पदाधिकार्‍यांना आहे. त्यामुळे उरण विधानसभा मतदारसंघातून आपल्या कार्यतत्पर नेत्याचा अर्ज दाखल करण्यासाठी मित्र मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, तसेच हितचिंतक व नागरिकांनी सकाळी 10 वाजता दास्तान फाटा (जासई) येथील श्री शिवस्मारकाजवळ मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर, खालापूर तालुका अध्यक्ष बापू घारे, तसेच महेश बालदी मित्र मंडळाचे उरण, पनवेल व खालापूर तालुक्यातील प्रमुखांनी केले आहे.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply