Breaking News

निवडणुकीच्या तोंडावर गाव बैठकांवर जोर

पाली ः प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. काही दिवसांपूर्वी आचारसंहितादेखील लागू झाली आहे. प्रचारासाठी फार थोडे दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विधानसभेसाठी प्रस्थापित आमदार व इच्छुक उमेदवार यांच्या मोर्चेबांधणीस सुरुवात झाली असून सर्वत्र गाव बैठकांवर अधिक भर दिला जात आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी गाव बैठकांना जास्त पसंती आहे. अशातच बंडखोर व अपक्ष उमेदवारांनीदेखील निवडणुकीत उडी घेतल्याने चुरस अधिक वाढली आहे. अशातच कार्यकर्त्यांत ठसन सुरू झाली असून आमचाच नेता सुपर म्हणत कार्यकर्त्यांच्या प्रचारात जोर दिसू लागला आहे. आपापल्या पक्षाचे उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आता खर्‍या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर चढला आहे. जिल्ह्यात विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत. बहुसंख्य भाग ग्रामीण आहे, तसेच ग्रामीण भागातील मतदार हक्काचे व एकगठ्ठा मतदान करणारे असतात. परिणामी त्यांच्यावरच उमेदवारांचे भवितव्य ठरलेले आहे. मग गावागावात विश्वासू ग्रामस्थ व कार्यकर्त्यांच्या बैठकांना सध्या उधाण आले आहे. अलिबाग, सुधागड, महाड, पेण, श्रीवर्धन, कर्जत आदी ठिकाणी गाव बैठका होत आहेत.  या गाव बैठका प्रामुख्याने रात्री पक्षाच्या विश्वसनीय पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांच्या घरी होतात. काम करून घरी परतलेले लोक या वेळी आवर्जून भेटतात. या वेळी गावातील समस्या सोडविणे तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे याबद्दल आश्वासने दिली जातात. आगामी काळात कशा प्रकारे गावातील सांडपाणी, रस्ते, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडविले जातील याची माहिती दिली जाते. हे झाले गावातील लोकांसाठी, पण खास कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांच्या गाव बैठकांमध्ये आपल्या उमेदवाराला निवडून कसे आणावे याची व्यूहरचना आखली जात आहे. त्यामध्ये कोणते कार्यकर्ते फोडावे, कोणत्या घरात अधिक मतदार आहेत, बाहेरगावी असलेले मतदार निवडणुकीच्या दिवशी कसे आणावेत, कोणी कोणती जबाबदारी घ्यावी, लोकांपर्यंत उमेदवारांची कामे प्रत्यक्षपणे व सोशल मीडियाच्या माध्यमातून कशी पोहचवावी या सगळ्याची व्यूहरचना आखली जाते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply