Breaking News

महात्मा फुले महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

मान्यवरांची लाभली उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी (दि. ३०) पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबईचे माजी चेअरमन डॉ. देवानंद शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत शिक्षणाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, आजच्या बदलत्या युगासोबत स्वतःमध्ये बदल करत आपल्या आयुष्यातील ध्येय पुढे ठेवून चालावे. ‌‘थांबला तो संपला‌’ या म्हणीप्रमाणे विद्यार्थ्यांनी आदर्श नागरिक म्हणून जीवन कसे जगता येईल यासाठी प्रयत्न करावा तसेच पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी अशा थोर महापुरुषांचा आदर्श घेऊन स्वतःच्या भविष्याची वाटचाल करावी.
शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले की, रयत शिक्षण संस्थेचा वारसा पुढे घेऊन आपण चालला आहात. आपले आदर्श महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे चरित्र जरूर वाचावे. त्यातून व्यक्तिमत्वाचा विकास होईल.
ते पुढे म्हणाले की, आयुष्यात मोठी स्वप्ने पहा. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अशक्य काहीच नाही. यश मिळवण्यासाठी संयम पाहिजे. अनेक संधीचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी खुले आहेत. केवळ नोकरीच्या मागे न लागता व्यवसायही करावा. जिथे कुठेही तुम्ही संशोधक, शिक्षक, उद्योजक, व्यापारी व्हाल तिथे तुम्ही सर्वोत्कृष्ट व्हा आणि एक जबाबदार नागरिक म्हणून देशाची सेवा करा.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी उपस्थितांचे स्वागत व मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. रमेश म्हात्रे, डॉ. लक्ष्मण गवळी, प्रा. जनार्दन वारघडे यांच्यासह विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.पी.एस. गायकर व डॉ. प्रफुल्ल वशेणीकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ. आर.पी. म्हात्रे यांनी मानले.पनवेल ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी (दि. ३०) पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबईचे माजी चेअरमन डॉ. देवानंद शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत शिक्षणाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, आजच्या बदलत्या युगासोबत स्वतःमध्ये बदल करत आपल्या आयुष्यातील ध्येय पुढे ठेवून चालावे. ‌‘थांबला तो संपला‌’ या म्हणीप्रमाणे विद्यार्थ्यांनी आदर्श नागरिक म्हणून जीवन कसे जगता येईल यासाठी प्रयत्न करावा तसेच पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी अशा थोर महापुरुषांचा आदर्श घेऊन स्वतःच्या भविष्याची वाटचाल करावी.
शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले की, रयत शिक्षण संस्थेचा वारसा पुढे घेऊन आपण चालला आहात. आपले आदर्श महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे चरित्र जरूर वाचावे. त्यातून व्यक्तिमत्वाचा विकास होईल.
ते पुढे म्हणाले की, आयुष्यात मोठी स्वप्ने पहा. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अशक्य काहीच नाही. यश मिळवण्यासाठी संयम पाहिजे. अनेक संधीचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी खुले आहेत. केवळ नोकरीच्या मागे न लागता व्यवसायही करावा. जिथे कुठेही तुम्ही संशोधक, शिक्षक, उद्योजक, व्यापारी व्हाल तिथे तुम्ही सर्वोत्कृष्ट व्हा आणि एक जबाबदार नागरिक म्हणून देशाची सेवा करा.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी उपस्थितांचे स्वागत व मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. रमेश म्हात्रे, डॉ. लक्ष्मण गवळी, प्रा. जनार्दन वारघडे यांच्यासह विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.पी.एस. गायकर व डॉ. प्रफुल्ल वशेणीकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ. आर.पी. म्हात्रे यांनी मानले.

Check Also

खोपोलीतील ‌‘उबाठा‌’ कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल

खोपोली : प्रतिनिधीशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खोपोली शहर संघटक दिलीप पुरी यांचे पुत्र आमिष …

Leave a Reply