पनवेल : रामप्रहर वृत्त
थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या ३८व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात शुक्रवारी (दि.१) गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत ग्रामस्वच्छता मोहिमेद्वारे झाली.
या स्वच्छता मोहिमेत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येेष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, वाय.टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्यासह स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्व. भगतसाहेबांनी गव्हाणसह पनवेल तालुक्यात सामाजिक कार्याचा ठसा उमटवला होता. त्यांच्या ७ मे या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून गव्हाण गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत ग्रामस्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी उद्योजक वैभव देशमुख यांच्या वतीने येथील ग्रामपंचायतीला घंटागाडी भेट देण्यात आली. या घंटागाडीचे लोकार्पण लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या मोहिमेवेळी पंचायत समिती जिज्ञासा कोळी, माजी सदस्य हरिभाऊ पाटील, रत्नप्रभा गव्हाण, माजी सरपंच माई भोईर, माजी उपसरपंच विजय घरत, सचिन घरत, हेमंत ठाकूर, अजय भगत, विश्वनाथ कोळी, वसंत म्हात्रे, हेमंत पाटील, अमृत भगत यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, स्व. भगतसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त पुढील काही दिवसांत विविध सामाजिक, सांस्कृतिक व लोकहिताचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper