Breaking News

नतनोत्सवाने पनवेलमध्ये रंगला कलेचा सुरेल जल्लोष

नगरसेवक परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
सांस्कृतिक कलेचा वारसा जपणाऱ्या नृत्यार्पण फाईन आर्ट सेंटरच्या वतीने नुकताच नतनोत्सव हा विशेष कार्यक्रम पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नगरसेवक परेश ठाकूर यांनी म्हटले की, कलेमुळे स्वतःला व्यक्त होण्याची संधी मिळते आणि आजच्या धावपळीच्या काळात व्यक्त होणे हे स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करण्याचे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे.
“स्वप्नातील प्रत्येक आत्म्याला जोडणारा उत्सव” असे ब्रीदवाक्य घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याने प्रेक्षकांची मने जिंकली.
या रंगतदार कार्यक्रमात भारतीय शास्त्रीय नृत्यासोबतच विविध कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले, ज्यामध्ये संस्थेच्या नवोदित कलाकारांच्या कौशल्याचे दर्शन घडले. नृत्यातून मांडण्यात आलेले विविध भाव आणि लयबद्ध हालचाली हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले.
या कार्यक्रमास नगरसेवक समीर ठाकूर, नगरसेविका राजेश्री वावेकर, दिग्दर्शक जेपी ठकझी, घुंगरू नृत्य महोत्सवाचे क्युरेटर सिंधू नायर, हरिकुमारन मेनन, रमेश अंबालापुझा, भाजप दक्षिण भारतीय सेलचे पुणे शहर सरचिटणीस विजयन नायर, दामोदरन पिल्लई, अनिल प्रकाश, नृत्यार्पण फाईन आर्ट सेंटरच्या फाऊंडर अँड डायरेक्टर नयना प्रकाशन आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply