Breaking News

दसरा गणेशोत्सवास सुरुवात, लोकनेते रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर यांनी घेतले दर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त

दसरा गणेशोत्सव मंगळवारपासून (दि. 8) मोठ्या उत्साहात सुुरू झाला आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोपर येथे आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेलघर येथे गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी भाजपचे उलवे नोड 2चे अध्यक्ष विजय घरत, वामनशेठ म्हात्रे, अनंता ठाकूर, युवा नेते साईचरण म्हात्रे, अर्चना परेश ठाकूर यांच्यासह गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनेक ठिकाणी दसरा गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेऊन

आशीर्वाद घेतले. आमदार प्रशांत ठाकूर विधानसभा निवडणुकीच्या   प्रचारात व्यस्त असतानाही त्यांनी वेळ काढून गणरायाचे दर्शन घेतले. त्यामुळे मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी समाधान  व्यक्त केले.

Check Also

नतनोत्सवाने पनवेलमध्ये रंगला कलेचा सुरेल जल्लोष

नगरसेवक परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तसांस्कृतिक कलेचा वारसा जपणाऱ्या नृत्यार्पण फाईन …

Leave a Reply