Breaking News

‘पीएसएलव्ही’चे अर्धशतक; 50व्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरीकोटा : प्रतिनिधी

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने अर्थ इमेजिंग सॅटलाइट रिसॅट-2 बीआर 1 या उपग्रहाचे बुधवारी (दि. 11) प्रक्षेपण केले. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरून पीएसएलव्ही रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आले. ‘पीएसएलव्ही’ची ही 50वी मोहीम होती.

रिसॅट-2 बीआर 1 हा रडार इमेजिंग अर्थ ऑब्जर्व्हेशन सॅटेलाइट असून, या मालिकेतील हा दुसरा उपग्रह आहे. रिसॅट उपग्रहांचा प्रामुख्याने हेरगिरीसाठी उपयोग करण्यात येणार आहे. या उपग्रहासोबत इस्रोने अन्य देशांच्या आणखी नऊ उपग्रहांचे प्रक्षेपण केले. यातील सहा उपग्रह अमेरिकेचे, तर इस्रायल, इटली आणि जपानचा प्रत्येकी एक उपग्रह आहे.

चांद्रयान-2 ही यंदाच्या वर्षातील इस्रोची सर्वात मोठी व महत्त्वाकांक्षी मोहीम होती, मात्र या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग होऊ शकले नाही. गगनयान ही इस्रोची पुढची महत्त्वपूर्ण मोहीम आहे. या मिशनतंर्गत तीन भारतीयांना अवकाशात पाठविण्याचे इस्रोचे लक्ष्य आहे.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply