Breaking News

प्रभाग क्र. 1मधील कार्यकर्त्यांनी फोडले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे फटाके

पनवेलः वार्ताहर

188 पनवेल विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सोमवारी सायंकाळी उशिरा महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी प्रत्येक प्रभागात जाऊन कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची भेट घेतली. शहरातील प्रभाग क्र.18 येथे ते भेट देण्यासाठी आले असता उपस्थित असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी फटाके फोडून निकालाआधीच त्यांच्या विजयाची घोषणा केली. प्रभाग क्र. 10चे नगरसेवक व भाजप चिटणीस नितीन पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी गोखले हॉल परिसरात बुथ उभारला होता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, उपमहापौर विक्रांत पाटील व इतर पदाधिकारी व महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. मतदान प्रक्रिया संपल्यावर महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी प्रत्येक बुथवर जाऊन मतदानाचा आढावा घेतला तसेच कार्यकर्त्यांची भेट घेतली व त्यांचा उत्साह वाढविला. या वेळी प्रभाग क्र.18च्या बुथवर आले. त्या वेळी त्यांचे जल्लेाषात स्वागत करण्यात आले. एकच वादा प्रशांत दादा अशा घोषणा सुद्धा देण्यात आल्या. तर काहींनी फटाक्यांची आतषबाजीसुद्धा केली. त्याचप्रमाणे सर्वांनी भारत माता की जय व मोदींचा जयजयकार केला. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून प्रशांत ठाकूर हे निकालाआधीच निवडून आल्याचे चित्र दिसून येत होते. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा विजय निश्चित मानला जात असल्याने कार्यकर्ते आता निकालाच्या दिवशी काढावयाच्या मिरवणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply