मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याला भेट दिली. त्यानंतर त्यांनी त्रिवेणी संगमावर गंगेत स्नान केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याला भेट दिल्यानंतर आपल्या ट्विटर अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत, तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित भव्य आणि दिव्य अशा कुंभमेळ्यातील स्वच्छतेबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे.