Breaking News

पनवेल : रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक, तसेच रयत बँकेचे संचालक प्रमोद कोळी यांची रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य म्हणून निवड झाली आहे.त्यानिमित्त बुधवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रमोद कोळी यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, प्राचार्या साधनाताई डोईफोडे, रवींद्र भोईर, डी. के. म्हात्रे, महेश म्हात्रे आणि सर्व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य उपस्थित होते.

Check Also

अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …

Leave a Reply