Breaking News

जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार -आमदार महेश बालदी

पनवेल : रामप्रहर वृत्त

उरण विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास हाच आपला उद्देश असून, जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखवेन, अशी ग्वाही आमदार महेश बालदी यांनी दिली.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महेश बालदी यांनी माजी आमदार विवेक पाटील आणि तत्कालीन आमदार मनोहर भोईर यांचा पराभव केला. त्यानंतर आमदार बालदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला, तर लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघातील अनेक विभागांत जाऊन त्यांनी जनतेचे आभार मानले व ग्रामस्थांशी संवाद साधला. नुकतेच गुळसुंदे तसेच उलवे विभागात सदिच्छा भेट देऊन आमदार बालदी यांनी मतदारांचे व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.

या वेळी बोलताना आमदार बालदी यांनी आपण दाखविलेला विश्वास माझ्यासाठी काम करण्याची ऊर्जा आहे, असे सांगून जास्तीत जास्त विकास आणि प्रश्नांची सोडवणूक करण्याचे काम करणार असल्याचे स्पष्ट केले. या ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply