Breaking News

दीपाली कुंभारे-गोखे मिसेस टुरिझम ब्रँड अॅ्म्बेसेडर 2019

पनवेल : रामप्रहर वृत्त

खारघर येथील दीपाली कुंभारे-गोखे यांनी फिलिपिन्समधील मनिला येथे झालेल्या मिसेस टुरिझम 2019 या सौंदर्य स्पर्धेत मिसेस टुरिझम ब्रँड अ‍ॅम्बेसेडर 2019 हा किताब जिंकला. याबद्दल त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिनंदन केेले.

टुरिझमचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने आंतरराष्ट्रीय पातळीवर मेगास्टार प्रोडक्शन व मिसोसो लॉगी डायरेक्टर ओवेट रिकाडल्ये यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत विविध देशांतील 26 प्रतिनिधींनी भाग घेतला. यात संस्कृती, घडामोडी, बुद्धिमत्ता, आरोग्य व आचार-विचार अशा अनेक गोष्टींवर गुण देण्यात आले.

दीपाली कुंभारे-गोखे यांनी भारताचे प्रतिनिधित्व करीत स्पर्धेच्या अनेक फेर्‍या पार करून किताब आपल्या नावे केला. याव्यतिरिक्त त्यांना मिसेस टुरिझम फेमस मदर ऑन सोशल मीडिया 2019 व मिसेस परसोना हाही किताब प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांना नॅशनल डायरेक्टर फॉर इंडिया घोषित करण्यात आले.

दीपाली कुंभारे-गोखे डबल पोस्ट ग्रॅज्युएट, एमएससी, एमएड् असून, त्यांनी नवी मुंबईतील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल व एन रॅडक्लिफ स्कूलमध्ये मुख्याध्यापिका म्हणून काम पाहिले आहे. या यशाचे श्रेय त्यांनी त्यांचे आई-वडील, यजमान व मुलींना समर्पित केले. चंद्रपूर ग्रामीण भाग ते नवी मुंबई ते मिसेस टुरिझम ब्रँड अ‍ॅम्बेसेडर हा दीपाली यांचा प्रवास थक्क करणारा असून, त्यांचे यश देशातील महिलांसाठी प्रेरणादायी आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply