Breaking News

नेरळमध्ये त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त रोषणाई

कर्जत : बातमीदार

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नेरळ येथील श्री कुसुमेश्वर मंदिरात मंगळवारी (दि. 12) रात्री दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. श्री समर्थ सेवा संघाच्या वतीने कुसुमेश्वर मंदिर परिसर शेकडो दिव्यांनी उजळवून टाकण्यात आला होता.  नेरळ गावातील कुसुमेश्वर मंदिर पुरातन असल्याच्या नोंदी आहेत. या मंदिरात मंगळवारी रात्री त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर परिसरात दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती आणि तेथे असलेला दीपमाळदेखील  दिव्यांनी उजळवून टाकण्यात आला होता. यावेळी मंदिर परिसरात शेकडो भाविक उपस्थित होते. त्या सर्वांचे स्वागत श्री समर्थ सेवा संघाकडून अरुण धारप, बल्लाळ जोशी, अनंत कर्वे करीत होते. स्थानिक कलाकारांनी रात्री अभंगवाणीचा कार्यक्रम सादर केला होता.

Check Also

अनुसूचित जमातीच्या विशेष पदभरतीचा प्रश्न विधिमंडळात!

प्रलंबित भरती तातडीने पूर्ण करण्याची आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी मुंबई …

Leave a Reply