Breaking News

तिहेरी हत्याकांडातील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

माणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील दहिवली गावात झालेल्या तिहेरी हत्याकांडातील आरोपी संतोष शिंदे याच्या पोलीस कोठडीत माणगाव न्यायालयाने एका दिवसाची वाढ केली आहे.

कौटुंबिक भांडणातून संतोष शिंदे याने 7 नोव्हेंबर रोजी सकाळी आपल्या पवन (वय 5) व संचित (वय 2) या दोन लहान मुलांसह पत्नी सुहानी (वय 30) हिची गळा दाबून हत्या केली होती. त्याची कबुली दिल्यानंतर आरोपी संतोष शिंदे याला पोलिसांनी अटक करून 8 नोव्हेंबरला माणगाव न्यायालयासमोर हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पेालीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी (दि. 15) त्याला पुन्हा माणगाव न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत एका दिवसाची वाढ केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास गोरेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल टोपे करीत आहेत.

Check Also

अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …

Leave a Reply