Breaking News

विविध गुन्ह्यांतील आरोपी जेरबंद

पनवेल शहर पोलिसांची कामगिरी

पनवेल ः वार्ताहर

शहर पोलीस ठाण्याने केलेल्या धडक कारवाईत पनवेल शहर परिसरातील मोटरसायकल चोरीचे 12 गुन्हे उघडकीस आणले असून त्याचप्रमाणे इतर गुन्ह्यातील असे मिळून एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर या गुन्ह्यात सहभागी असलेले चार विधीसंघर्षित बालकांना बालनिरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसापासून पनवेल शहर परिसरातून स्कुटी, अ‍ॅक्टीव्हा, युनिकॉर्न, केटीएम, बजाज बॉक्सर, अ‍ॅक्सेस इ.मोटार सायकली चोरीस गेल्या होत्या. तर स्कुटीच्या डिकीचे लॉक बनावट चावीने उघडून त्यातील आतील ऐवज चोरी झाल्याच्या घटना सुद्धा घडल्या होत्या. या संदर्भात पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या आदेशाने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे, पो.हवा.विजय अहिरे, रवींद्र राऊत, पो.ना.राजेश मोरे, अमरदिप वाघमारे, पो.शि.सुनील गर्दनमारे, यादवराव घुले

यांनी तपास सुरू केला.

त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सुशिल सुनील म्हस्के (25 रा.कोपरा गाव) व संतोष राजकुमार कांबळे (18 रा.मालधक्का शेड) यांच्यासह 4 विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून तीन लाख रुपये, वीस हजार रुपये किंमतीच्या बारा मोटरसायकल व या गुन्ह्यात वापरलेले स्क्रु ड्रायव्हर, कटर हस्तगत करण्यात आले. यांच्या अटकेमुळे शहर पोलीस ठाण्यातील 10, सानपाडा पोलीस ठाण्यातील 1 व खारघर पोलीस ठाण्यातील 1 गुन्हा उघडकीस आला आहे. त्याचप्रमाणे स्कुटीच्या डिकीतून बनावट चावी वापरुन आतील ऐवज काढण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसापासून वाढले होते.

या प्रकरणी वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पो.नि.इर्शान खरोटे, पो.हवा.दिलीप चौधरी, पो.ना.पंकज पवार, दिनेश जोशी, पो.शि.राहूल साळुंखे, अजय कदम, राजू खेडकर आदींच्या पथकाने सापळा रचून आरोपी विकास मोहन धोत्रे (वय 37 रा.आकुर्ली गाव) याला ताब्यात घेवून त्याच्याकडून जवळपास 61 हजार 200 रुपयाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शहर पोलीस ठाण्याकडील मोटार अपघाताच्या गुन्ह्यात हवा असलेला आरोपी नाझिम अब्दुल रझ्झाक बेवारे (वय 36) हा त्याच्या ताब्यातील स्कोडा गाडीचा अपघात करून सदरची गाडी घटनास्थळी सोडून पळून गेला होता. यावेळी त्या गाडीमध्ये जनावरांचे मांस आढळून आले होते.

याबाबत वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वासराव बाबर, पो.हवा.संदीप फाळके यांनी सदर आरोपीस वालचंद नगर, जि.पुणे येथून ताब्यात घेेवून त्याला अटक केली आहे. या सराईत आरोपीवर यापूर्वी जुन्नर पोलीस ठाण्यात व पुणे ग्रामीण येथे 3 गुन्हे दाखल आहेत.

नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित पार्कींगमध्ये उभी करावीत. वाहनांना चोरी प्रतिबंधक होण्यासाठी हॅण्डल लॉक, सायरन, जीपीएस सिस्टीम यंत्रणा बसवून घ्यावी.

– अजयकुमार लांडगे, वपोनि

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply